Saturday, April 4, 2020

या चिमण्यांनो परत फिरा रे

लता ताईंनी गायलेलं खळे काकांचं हे अजरामर गीत. स्वर आणि चाल तर हेलावून टाकणारी आहेच पण त्याही पेक्षा माडगूळकरांचे शब्द कातर करणारे आहेत.  घरातून बाहेर पडून , आपली आपली आव्हाने झेलणाऱ्या, नवीन क्षितिजे पादाक्रांत करणाऱ्या लेकरांना घरी परतण्यासाठी घातलेली आईची प्रेमळ आर्त हाक. त्या हाकेला प्रतिसाद न देता राहणारा एखादाच.
पण अशी हाक मारणारी आईच उरली नाही तर लेकराने काय करायचं...घराची ओढ तरीही लागतेच... आठवणी तरीही साद घालतात...घरी जायची तयारी पण जोरात सुरू असते. तिकीट बुक केलं जातं, मन मात्र विषण्ण. ती वाट बघणारी माऊली कुठेय आता, उत्साहाने भरभरून, चारी ठाव स्वयंपाक तयार ठेवून वाटेकडे डोळे लावून बसणारी...
तिला कुठे फोन करता येतोय, झालं बुकिंग , आलेच, असं म्हणायला...नुसतच कासावीस होणं. उगाच जाऊन सगळ्या WhatsApp group येण्याची वर्दी द्यायची, खरतर तिला सांगायचंय की मी येतेय पण कुठे सांगता येतंय...तरी व्यर्थ धडपड करायची. तळमळ कशाची आणि काउंटर active बुद्धिवादी तडजोडी कसल्या. सगळच केविलवाणं.

जिवाभावाची , माझी असलेली  माणसं आहेत इथे समवेत आणि भारतातही.  खरं सांगायचं तर उन्हीसे तो दुनिया कायम है मेरे लिये... पण जे हातातून निसटून गेलं, अनंतात विलीन झालं ते अमूल्य  होतं... अपूरणीय आहे.

 मनाला कितीही माहीत असलं की असं होणारच तरी प्रत्यक्ष त्या परिस्थितीतून जाताना घालमेल ही होतेच. We can't  precisely anticipate the sinking feeling of loosing our loved one in life . In anticipation we always under or over estimate the gravity of feelings. What you actually go though after is incomparable to what you had anticipated.

Guys enjoy the privilege of having family and loved ones  before it's too late.🙏

अदिती/ मोनाली

No comments: